तू .......कधी लहरता वारा
तू .......कधी मृगाच्या धारा
तू .......श्वास भरला सुगंध
तू ......शाम रंग मिलिंद ....
तू ........गर्द निळे आकाश
तू .......मृगजलासम भास
तू .......बंधमुक्त स्वच्छंद
तू ........शाम रंग मिलिंद
हसर्या झर्यापरी अवखळ
हृदयातला तू दुरवरी काल
बेफिक्र जोगी बेधुंद
तू शाम रंग मिलिंद
तू श्वासांचे तरणे
तू डावात भिजले गाणे
जळी जस्त हळुवार तरंग
तू .........शाम रंग मिलिंद
No comments:
Post a Comment